साद मातृभूमीस्

[9:15 AM, 10/15/2017] +91 75065 82341: भारत…या देशावर अनेक परकीय आक्रमणे झाली .बराचसा परकीय सत्तासंघर्ष पाहिला आणि सोसला आहे या भारताने . इंग्रजांच्या 150 वर्षांच्या गुलामीतून मुक्त होण्याकरता कित्येकांना बलिदान द्यावे लागले . भारत स्वतंत्र झाल्यापासून ते आजतागायत, पिछाडीवरून - आघाडीवर येताना , देशाने साजेशी अशी प्रगती नक्कीच केली आहे . भारत राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, शिक्षण, व्यापार-उद्योग, क्रीडा, विज्ञान-तंत्रज्ञान, वाहतूक-दळणवळण इ. क्षेत्रांत दिवसेंदिवस पुढे सरसावत आहे .
परंतु आजही “आपण” (भारतीय) विकसित राष्ट्र नसल्याची खंत मनात आहे . हे असेच राहिले तर भारताचे दिवंगत माजी राष्ट्रपती ए.पी.जे.अब्दुल कलाम यांचे “INDIA VISION 2020” हे स्वप्न , स्वप्नचं राहिलं… यास कदाचित एका ब्रीदवाक्याचा अपूर्ण अवलंब जबाबदार आहे , असे मला वाटते . ते वाक्य , “भारत माझा , मी भारताचा” . एक भारतीय म्हणून भारताला प्रगतीपथावर नेण्याची जबाबदारी प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे . हे लक्षात घ्यायला हवे .
या ठिकाणी शिक्षणाची फार महत्त्वाची भुमिका आहे . प्रत्येक नागरिकाला प्राथमिक शिक्षण गरजेचे आहे . शहरांपासून ते खेड्यांपर्यंत शिक्षणाचे महत्त्व वाढायला हवे . तसेच महाविद्यालयीन शिक्षण आणि उच्च शिक्षणाचा प्रसार होणे गरजेचे आहे . प्रत्येक स्तरातील विद्यार्थ्याला विद्या मिळायला हवी . शिक्षणाच्या विविध क्षेत्रांच्या कक्षा रूंदावणे यासाठी प्रयत्न करायला हवा . व्यवसायिक शिक्षणातील कौशल्य वाढीस चालना द्यायला हवी .
भारताची ताकद असलेल्या तरूणाईला योग्य मार्गदर्शनाची गरज भासत आहे . पालक आणि शिक्षक हे उत्तमप्रकारे करू शकतात . स्त्री-पुरूष समानतेने भारतास सक्षम बनवणे हिताचे ठरेल . देशातील दुर्बल भावंडांना प्रोत्साहित करून त्यांस देशाच्या संभाव्य विकासात हातभार लावण्यास आवाहन करावे . शारिरीक-मानसिक अपंगत्त्व , आंधळेपण , मूक-बधिर , दुर्घटनाग्रस्त बांधवांना बळ देवून त्यांस सक्षम बनवण्यास प्रयत्न करायला हवा . देशाच्या विकासकार्यांत तरूणांनी पुढाकार घ्यावा .
बालवयापासूनच राष्ट्रप्रेमाचे बाळकडू देणे गरजेचे वाटते . लहान वयापासूनच राष्ट्रहिताचे धडे गिरवायला शिकवायला हवे . त्यासाठी थोरांचा अनुभव कामी येईल . “थोरांचे अनूभवी ज्ञान-बालवयात योग्य मार्गदर्शन-तरूणाई सक्षमीकरण” यासाठी प्रयत्नशील असावे . यासाठी प्रत्येक भारतीयाने सुसज्ज व्हावे आणि स्वः सोबतच देशाच्या विकासात खारीचा वाटा उचलण्यास नेहमी तत्त्पर असावे . “ जय हिंद , जय भारत “

शब्दांकन- ओंकार दिलीप बागल

comments powered by Disqus