चिन्मय चिद्रुप अक्षय डोळा

चिन्मय चिद्रुप अक्षय डोळा ।
दिसें रूपें रूप आगळा ।
आगमा निगम न कळे कळा ।
तोचि लक्षालक्ष लक्षु निराळा ॥१॥
बाबा बाळसंतोष ।
बाळ संतोष बाबा बाळसंतोष ॥धृ. ॥
दृश्य अदृश्य आटले ।
द्वैताद्वैत ते फिटले ।
ज्ञोय ज्ञाता ज्ञाने भेटले ।
सद्‌गुरुचरण लक्ष लक्षिले ॥२॥
दया क्षमा शांति विरुक्‍ती ।
मावळली व्यक्‍ताव्यक्‍ती।
उडॊनी गेली सकळ भ्रांती ।
जाहली संसाराची शांति ॥३॥
दान दिधल्या नुरेचि कर्म ।
निवारला भवभ्रम।
जाहलो नि:संग निष्काम ।
एका जनार्दनी विश्राम ॥४॥

comments powered by Disqus