भवानी मी तुझा भुत्या खरा ...

भवानी मी तुझा भुत्या खरा ॥ धृ॥
आनुहात चवडंक वाजत डुगडुग । होतो घोष बरा ॥१॥
बोधाची परडी ज्ञानाचा संबळ । आज्ञान तो पोत खरा ॥२॥
एका जनार्दनी भुत्या मी झालो । तुझे पायी मी खरा ॥३॥

comments powered by Disqus