जोहार

मी निर्गुणपुरीचा महार । करितों जोहार ॥ १ ॥

पाटीलबाबा तुमचे वस्तींत । पाटलिणीनें केलें बदमस्त ॥ २ ॥

तुमची रयत फिरली सारी । गांवचे बदलले कारभारी ॥ ३ ॥

आतां तुमचे नाहीं बरें । चौर्‍यांयशी लक्ष फिराल फेरे ॥ ४ ॥

एका जनार्दनीं महार । पायापाशीं केला जोहार ॥ ५ ॥

comments powered by Disqus