बेटकुळी

एक जटाधारी दिसत । एक डोळे वटारुनी पाहत । एक गुरकावुनी बोलत । एक गिळावयासी पाहत । ग ग ग ग । कसं करतंय । मी यैंव । मी यैंव सांवळें बाळ तान्हुलें । कसं करतय० ॥ध्रु०॥

एक पाताळमधीं राहत । त्रिभुवनीं त्याचीच मात । एक डोळ्यामधीं चमकत । त्यामधीं जग दिसत ॥ २ ॥

एकनाथ साधु भला । जनार्दनासी शरण गेला । देहीं याचा देव केला । त्यानें रूप दाविलें त्याला ॥ ३ ॥

comments powered by Disqus