कोल्हाटीण

सगुण गुण माया । आली कोल्हाटीण खेळाया ॥ धृ. ॥ प्रपंचाचा रोविला वेळु । चहुं शून्याचा मांडला खेळु । ब्रह्माविष्णु जयाचे बाळु । लागती पाया ॥ १ ॥ आला गडे निर्गुण कोल्हाटी । सोहं शब्दे ढोलगे पिटी । चैतन्याची उघडून दृष्टी । चला जाऊ पहाया ॥ २ ॥ कोल्हाटीण मारिती ऎशी उडी । एकवीस स्वर्गावरती माडी । देखे द्वार खिडकी उघडी । अगाध माया ॥ ३ ॥ कोल्हाटीण बसली असे डोळा । जाणे गुरु पुत्र विरळा । एका जनार्दनी लीळा । जाती वर्णाया ॥ ४ ॥

comments powered by Disqus