सर्प

वासुकी सर्प मोठा दारूण । क्रोधे बैसला बिळी जाऊन।

सहज मी तेथे केले गमन । तमोगुण घेलले सारवण ।

तेथून नष्ट आला धावून । त्याने मजवरी झडप घेतली जाण ॥ १ ॥

साप चावला । अगागागा । अबाबाबा ।

अताताता । अररेरे साप चावला ॥ धृ. ॥

याची जात मोठी कठीण । माया भुलली पडला येऊन ।

माझे जडावले मन । गरगर गिरकी आली दारूण ।

साप चावला ॥ २ ॥

या गिरकीचे नाही भय । मी सहस्त्र केले अन्याय ।

तोचि दडपला हा पाय । आता कोण वाचवील ठाव ।

साप चावला ॥ ३ ॥

माझा देवावर हवाला । प्राण जावो परता गेला ।

एका जनार्दनी म्हणे भला । आजिचा शेवट गोड झाला ॥ ४ ॥

comments powered by Disqus