वाघ्या

अहं वाघा साहं वाघा प्रेमनगरा वारी ।

सावध होऊनि भजनी लागा देव करा कैवारी ॥ १ ॥

मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी ॥ धृ. ॥

इच्छा मुरळीस पाहू नका पडाल नरकद्वारी ।

बोध बुधली ज्ञान दिवटी उजळा महाद्वारी ॥ २ ॥

आत्मनिवेदन रोडगा निवतील हारोहारी ।

एका जनार्दनी धन्य खंडेराव त्यावर कुंचा वारी ॥ ३ ॥

comments powered by Disqus