वेणु

अधरी धरूनि वेणु ।

वेणु वाजविला कोणी नेणु ॥ १ ॥

प्रात:काळी तो वनमाळी ।

घेऊन जातो धेनु ॥ २ ॥

उभी मी राहे वाट मी पाहे ।

केव्हां भेटेल मम कान्हु ॥ ३ ॥

एका जनार्दनी वाजविला वेणु ।

ऎकता मन झाले तल्लिन्नु ॥ ४ ॥

comments powered by Disqus