जनी जाय पाणियासी

जनी जाय पाणियासी । मागें धांवे हृषिकेशी ॥१॥

पाय भिजों नेदी हात । माथां घागरी वहात ॥२॥

पाणी रांजणांत भरी । सडासारवण करी ॥३॥

धुणें धुऊनियां आणी । ह्मणे नामयाची जनी ॥४॥

comments powered by Disqus