सगुण निर्गुण दोन्ही

सगुण निर्गुण दोन्ही विलक्षण
ब्रह्म सनातन विठ्ठल हा

पतितपावन मानसमोहन
ब्रह्म सनातन विठ्ठल हा

ध्येय ध्यास ध्यान चित्त निरंजन
ब्रह्म सनातन विठ्ठल हा

ज्ञानदेव ह्मणे आनंदाचे गान
ब्रह्म सनातन विठ्ठल हा

comments powered by Disqus