आम्ही लडिवाळ देवाचीं । दे...

आम्ही लडिवाळ देवाचीं । देव माउली आमुची ॥१॥

शीणभाग देवा सांगों । आवडे तें देवा मागों ॥२॥

स्नेहदृष्टी खालीं खेळूं । सलगीनें अंकीं लोळूं ॥३॥

तुका म्हणे कोडें । बोल वांकुडे बोबडे ॥४॥

comments powered by Disqus