संसारीं असोन स्मरे रामनाम...

संसारीं असोन स्मरे रामनाम । देव करी काम त्याचे घरीं ॥१॥

आणिक विचार नको धरुं मनीं । नामें चक्रपाणीं वश ॥२॥

केले अजामिळें कधीं नित्य नेम । मुखा आलें नाम एक वेळ ॥३॥

तुका म्हणे तुम्ही मुखीं नाम घोका । उपाय आणिकां पुसों नका ॥४॥

comments powered by Disqus