कांहीं करा रे साधन । जेणे...

कांहीं करा रे साधन । जेणें जोडे नारायण ॥१॥

त्यासी उपाय तो थोडा । गर्जें विठूचा पवाडा ॥२॥

जैशी प्राचीनाची दोरी । तैसे गुण देतो हरि ॥३॥

तुका म्हणे एका । भजा पंढरी-नायका ॥४॥

comments powered by Disqus