अंगें तैसें व्हावें । मग ...

अंगें तैसें व्हावें । मग देव्हारां बैसावें ॥१॥

जैसें पाहें गंगाजळ । तैसें हृदय निर्मळ ॥२॥

परक्याची कांता । जैसी मानी आपुली माता ॥३॥

तुका म्हणे पायवणी । त्याचें पाजा मज कोणी ॥४॥

comments powered by Disqus