ज्याचें होतांचि दर्शन । न...

ज्याचें होतांचि दर्शन । नुरे भान देहाचें ॥१॥

समपदीं पडे मिठी । होय तुटी संसारा ॥२॥

मान दंभ अहंकार । जाय दूर पळोनी ॥३॥

तुका म्हणे शुद्ध मन । हे चरण देखतां ॥४॥

comments powered by Disqus