लोकां सांगे ब्रम्हज्ञान ।...

लोकां सांगे ब्रम्हज्ञान । आपण कोरडा पाषाण ॥१॥

तेणें ज्ञान कां सांगावें । ज्ञानासारिखें वर्तावें ॥२॥

नित्य वाची ज्ञानेश्वरी । दारीं भिकार्‍यासी मारी ॥३॥

तुका म्हणे ऐसे लंड । आम्ही देखिले उदंड ॥४॥

comments powered by Disqus