संत तुकाराम - विठोबाचें नाम घ्यावें । प...

विठोबाचें नाम घ्यावें । पुढें पाऊल टाकावें ॥१॥

अवघा मुहूर्त शकून । हृदयीं विठ्ठलाचें ध्यान ॥२॥

तुका ह्मणे हरीच्या दासा । शुभकाळ सर्व दिशा ॥३॥

comments powered by Disqus