धांव घाली माझें आईं

धांव घाली माझें आईं ।
आतां पाहतेसी काईं ॥१॥

धीर नाहीं माझे पोटीं ।
जालें वियोगें हिंपुटीं ॥२॥

करावें सीतळ ।
बहु जाली हळहळ ॥३॥

तुका ह्मणे डोईं ।
कधी ठेवीन हे पायीं ॥४॥

comments powered by Disqus