डोलत डोलत टमकत

डोलत डोलत टमकत चाले ।
गोजिरीं पाउलें टाकूनियां ॥१॥

पायीं रुणझुण वाजतात वाळे ।
गोपी पहातां डोळे मन निवे ॥२॥

सांवळें सगुण मानस मोहन ।
गोपी रंजवण नामा ह्मणे ॥३॥

comments powered by Disqus