माझे मनोरथ पूर्ण

माझे मनोरथ पूर्ण करि देवा ।
केशवा माधवा नारायणा ॥१॥

नाहीं नाहीं मज आणिक सोयरा ।
न करीं अव्हेरा पांडुरंगा ॥२॥

अनाथांच्या नाथा होशी तूं दयाळा ।
किती वेळोवेळां प्रार्थूं आतां ॥३॥

नामा ह्मणे जीव होतो कासावीस ।
केली तुझी आस आतां बरी ॥४॥

comments powered by Disqus