संत बहिणाबाईचे अभंग

आपाजी गोसावी वाचोनीया पत्र । क्रोधें फार नेत्र भोवंडीत ॥ १ ॥

शुद्र होवोनिया नमस्कार घेत । पाप हें अद्‌‍भुत होत असे ॥ २ ॥

सोनाराच्या जाती म्हणविती ब्राह्मण । तयाचें दर्शन घेऊं नये ॥ ३ ॥

शूद्राचा अनुग्रह घेताती ब्राह्मण । भ्रष्टाकार पूर्ण होत असे ॥ ४ ॥

त्यासी शिक्षा द्यावी दोष नाहीं यासी । ऐसा निश्चयेंसी नेम केला ॥ ५ ॥

बहिणी म्हणे याचें प्रत्युत्तर लिहिलें । होय यथाकालें कार्यसिद्धी ॥ ६ ॥

comments powered by Disqus