संत बहिणाबाईचे अभंग

टाळ्या चिपोळ्यांचा ध्वनी आयकतां । आनंद हा चित्तां सामावेना ॥ १ ॥

लावियेले नेत्र निद्रेंत जागृती । तुकाराममूर्ति देखियेली ॥ २ ॥

ठेवियेला हस्त मस्तकीं बोलून । दिधलें वरदान कवित्वाचें ॥ ॥

बहिणी म्हणे नेणें स्वप्न कीं जागृती । इंद्रियांच्या वृत्ती वोसरल्या ॥ ४ ॥

comments powered by Disqus