रामाचें भजन तेंचि

रामाचें भजन तेंचि माझें ध्यान ।
तेणें समाधान पावईन ॥१॥

रामासी वर्णितां देहीं विदेहता ।
जाली तन्मयता सहजचि ॥२॥

राघवाचें रूप तें माझें स्वरूप ।
तेणें सुखरूप निरंतर ॥३॥

रामदास ह्मणें मज एणें गती ।
राम सीतापतीचेनि नामें ॥४॥

comments powered by Disqus