अभंग संग्राहक
विविध मराठी संतांच्या अभंगाची मी संग्राहक आहे.
दत्तात्रेय पूर्ण अवतार असून, ब्रम्हा, विष्णू आणि महेश यांचे एकत्रीत रूप आहे.

संत नामदेवांनी भक्ति-गीते आणि अभंगांची रचना करून समस्त जनता-जनार्दनाला समता आणि प्रभु-भक्तिची शिकवण दिली.

निळोबा महाराजांनी बाराशेच्यावर अभंग लिहीले आहेत. सर्व अभंगांतून त्यांनी विठ्ठल भक्ती गायलेली आहे. निळोबा महाराज विठोबाप्रमाणेच कृष्णाची भक्ती करीत. निळोबारायांनी श्रीकृष्ण चरित्र अतिशय उत्तम प्रकारे रचले आहे.

मुक्ताबाई, संत ज्ञानेश्वरांची सर्वात धाकटी बहीण, हिचा पाया अध्यात्मिक होता. मुक्ताबाईने चांगदेवाचे गर्वहरण केले. मुक्ताबाईंनी आपल्या अध्यात्मिक सामर्थ्याने ज्ञानदेवांच्या पाठीवर मांडे भाजले होते.

कान्होबा महाराज हे संत तुकाराम महाराजांचे गुरु होत. जगद्गुरू श्री तुकोबारायांचेनंतर कान्होबा महाराजांचा जन्म झाला. आत्मसत्तेचा खेळ माहीत असल्यामुळे त्यांनी लौकिक खेळाचे रूपांतर आध्यात्मिक खेळामध्ये केले. कान्होबा महाराज कुणी मेले तर त्याचे दु:ख मानत नाहीत आणि जिवंत झाल्याचा आनंद मानत नाहीत ; म्हणूनच ते एका अभंगामध्ये म्हणतात , ' मरण माझे मरोनि गेले। मज केलें अमर। '

श्रीजनार्दस्वामींचे ताटीच्या अभंगांचे पारायण करणे म्हणजे एक स्वर्गीय अनुभूती आहे.

जनाबाई, दासीपणाची कामे करीत असताना तिच्या मनाने, अभंगांतून आध्यात्मिक प्रगती आणि पारमार्थिक उन्नती केली.

संत गोराकुंभार हे महाराष्ट्रातील संत परंपरेतील संत आहेत. त्यांचा पिढीजात व्यवसाय मडकी बनविण्याचा होता. मडकी बनवताना ते विठ्ठलाचे अभंग म्हणत.
