वास्तुशास्त्र

वास्तूला दृष्ट लागते म्हणजे काय होते ? वास्तूचे जीवनमान मनुष्याच्या आयुष्यकालापेक्षा अधिक असते. त्यामुळे दूषित वास्तू अधिक काळ त्रासदायक स्पंदनांच्या माध्यमातून कार्य करू शकते.


दूषित वास्तूचा व्यक्‍तीवर होणारा परिणाम

.’व्यक्‍तीत वाईट शक्‍तीचा शिरकाव होण्याची शक्यता असणे
वास्तूत घनीभूत झालेली दूषित स्पंदने कालांतराने तिच्यातील मर्यादित वायूमंडलालाच तिचे कार्यकारी क्षेत्र बनवू शकतात. परिणामी वर्षानुवर्षे तेथे रहाणार्‍या व्यक्‍तींवर या दूषित स्पंदनांचा प्रभाव पडून त्या व्यक्‍तीला वाईट शक्‍तींचा त्रास होण्याचीही शक्यता असते; म्हणून त्रासदायक वास्तू सोडणे हे व्यक्‍तीच्या ऐहिक तसेच पारमार्थिक उन्नतीसाठी पोषक ठरते.

व्यक्‍तीची साधना व्यय (खर्च) होणे
साधना करणार्‍या व्यक्‍तीची साधना वास्तूतील त्रासदायक स्पंदने न्यून (कमी) करण्यात व्यय (खर्च) होते.

वास्तू वाईट शक्‍तींचे निवासस्थान बनल्याने तेथे रहाणार्‍या व्यक्‍तीला व्यापक स्तरावर त्रास होऊ शकणे.
दूषित वास्तू कालांतराने वाईट शक्‍तींचे निवासस्थान बनल्याने तेथे रहाणार्‍या व्यक्‍तींना शारीरिक, मानसिक, तसेच आध्यात्मिक अशा सर्वच स्तरांवर त्रास होण्याची, म्हणजेच व्यापक स्तरावर त्रास होण्याची दाट शक्यता असते