वास्तुशास्त्र

वास्तूला दृष्ट लागते म्हणजे काय होते ? वास्तूचे जीवनमान मनुष्याच्या आयुष्यकालापेक्षा अधिक असते. त्यामुळे दूषित वास्तू अधिक काळ त्रासदायक स्पंदनांच्या माध्यमातून कार्य करू शकते.


धूप करणे

वास्तूत धूप किंवा सात्त्विक उदबत्ती लावावी किंवा कडुनिंबाच्या पानांची धुरी दाखवावी. काही चांगल्या शक्‍ती या वायुरूप आणि सुगंधाने आकर्षित होणार्‍या असतात. धूप केल्याने या चांगल्या शक्‍ती वास्तूत आकर्षित होतात अन् त्यामुळे वास्तू सात्त्विक बनते. तसेच धूप केल्याने काही वाईट शक्‍ती वास्तूतून दूर जातात. धुपातून प्रक्षेपित होणार्‍या रजोगुणी, तसेच पृथ्वी आणि आप या तत्त्वांशी संबंधित लहरींमुळे वास्तूतील कनिष्ठ देवतांच्या लहरी कार्यरत होण्यास साहाय्य होते. प्रथम कनिष्ठ देवतांना संतुष्ट केल्यामुळे वास्तूतील वाईट शक्तींच्या संचारावर नियंत्रण येण्यास साहाय्य होते.