१
उठा उठा हो साधुसंत । साधा आपुले हित ।
गेला गेला हा नरदेह । मग कैचा भगवंत ॥ १ ॥
उठोनि वेगेंसी । चला जाऊं राऊळासी ।
जळती पातकाच्या राशी । काकड आरती देखलिया ॥ २ ॥
उठोनियां पहाटे । विठ्ठल पाहा उभा विटे ।
चरण तयाचे गोमटे । अमृतदृष्टी अवलोका ॥ ३ ॥
जागे करा रुक्मिणीवरा । देव आहे निदसुरा ।
वेगें निंबलोण करा । दृष्ट होईल तयासी ॥ ४ ॥
पुढें वाजंत्री वाजती । ढोल दमामे गर्जती ।
होते काकड आरती । पांडुरंगरायाची ॥ ५ ॥
सिंहनाद शंख भेरी । गजर होतो महाद्वारीं ।
केशवराज विटेवरी । नामा चरण वंदितो ॥ ६ ॥
२
उठा जागे व्हा रे आतां । स्मरण करा पंढरीनाथा ।
भावें चरणीं ठेवा माथां । चुकवीं व्यथा जन्माच्या ॥ १ ॥
धन दारा पुत्र जन । बंधू सोयरे पिशून ।
सर्व मिथ्या हें जाणून । शरण रिघा देवासी ॥ २ ॥
माया विघ्नें भ्रमला खरें । म्हणता मी माझेनि घरे ।
हें तों संपत्तीचें वारें । साचोकारें जाईल ॥ ३ ॥
आयुष्य जात आहे पाहा । काळ जपतसे महा ।
स्वहिताचा घोर वहा । ध्यानीं राहा श्रीहरीच्या ॥ ४ ॥
संतचरणी भाव धरा । क्षणाक्षणा नामा स्मरा ।
मुक्ति सायुज्यता वरा । हेंचि करा बापांनों ॥ ५ ॥
विष्णुदास विनवी नामा । भुलूं नका भव कामा ।
धरा अंतरी निजप्रेमा । न चुका नेमा हरिभक्ति ॥ ६ ॥
३
उठा पांडुरंगा आतां दर्शन द्या सकळीं ।
झाला अरुणोदय सरली निद्रेची वेळां ॥ १ ॥
संतसाधुमुनी अवघे झालेती गोळा ।
सोडा सेजसुख आतां पाहुं द्या मुखकमळा ॥ २ ॥
रंगमंडपीं महाद्वारीं झालीसे दाटी ।
मन उतावीळ रूप पाहावया दृष्टी ॥३॥
राही रखुमाबाई तुम्हां येऊ द्या दया ।
सेजें हालउनि जागे करा देवराया ॥४॥
गरुड हनुमंत पुढे पाहती वाट ।
स्वर्गीचे सुरवर घेऊनि आले बोभाट ॥५॥
झालें मुक्तद्वार लाभ झाला रोकडा ।
विष्णुदास नामा उभा घेऊनि काकडा ॥६॥
४
उठा अरुणोदय प्रकाश झाला । घंटा गजर गर्जिन्नला ।
हरि चौघडा सुरु झाला । काकड आरती समयाचा ॥ १ ॥
महाद्वारीं वैष्णवजन । पूजा सामुग्री घेऊन ।
आले द्यावे तयांसी दर्शन । बंदिजन गर्जती ॥ २ ॥
सभामंडपी कीर्तन घोष । मृदंग टाळ विणे सुरस ।
आनंदे गाती हरिंचे दास । परम उल्हास करूनियां ॥ ३ ॥
चंद्रभागे वाळ्वंटी । प्रातःस्नानाची जनदाटी ।
आतां येतील आपुले भेटी । उठीं उठीं गोविंदा ॥ ४ ॥
ऐसे विनवी रुक्मिणी । जागृत झाले चक्रपाणी ।
नामा बद्धांजुळी जोडुनि । चरणीं माथा ठेवितसे ॥ ५ ॥
५
उठा पांडुरंगा प्रभात समयो पातला ।
वैष्णवांचा मेळा गरुडपारीं दाटला ॥ १ ॥
वाळवंटापासूनि महाद्वारापर्यंत ।
सुरवरांची दाटी उभे जोडूनि हात ॥ २ ॥
शुकसनकादिक नारद तुंबर भक्तांच्या कोटी ।
कवाडा आडूनि पाहताती जगजेठी ॥ ३ ॥
सुरवरांची विमाने गगनीं दाटली सकळ ।
रखुमाबाई माते वेगी उठवा घननीळ ॥ ४ ॥
रंभादिक नाचती उभ्या जोडूनि हात ।
त्रिशूळ डमरू घेऊनि आला गिरजेचा कांत ॥ ५ ॥
पंचप्राण आरत्या घेऊनियां देवस्त्रिया येती ।
भावें ओवाळिती राही रखुमाईचा पती ॥ ६ ॥
अनंत अवतार घेसी भक्तांकारणें ।
कनवाळु कृपाळु दीनालागी उद्धरणें ॥ ७ ॥
चौयुगांचा भक्त नामा उभा कीर्तनीं ।
पाठीमागे डोळे झांकुनि उभी ती जनी ॥ ८ ॥
६
सहस्त्र दींपे दीप कैसी प्रकाशली प्रभा ।
उजळल्या दशदिशा गगना आलीसे शोभा ॥ १ ॥
काकड आरती माझ्या कृष्ण सभागिया ।
चराचर मोहरलें तुझी मूर्ति पाहाया ॥ २ ॥
कोंदलेसे तेज प्रभा झालीसे एक ।
नित्य नवा आनंद ओवाळितां श्रीमुख ॥ ३ ॥
आरती करितां तेज प्रकाशले नयनीं ।
तेणें तेजें मिनला एकाएकीं जनार्दनीं ॥ ४ ॥
७
कां हो तुम्ही निश्र्चितीनें निजलाती हरी ।
मानिलें हें सुख आम्ही वाचुं कैशापरी ॥ १ ॥
उठा सावध व्हावे क्षेम सकळां द्यावें ।
जया जी वासना तयां तैसे पुरवावें ॥ २ ॥
जन्मोजन्मीं सांभाळिलें क्षमा करा अन्याय ।
कृपा करी देवा आम्हां तूंचि बापमाय ॥ ३ ॥
तुका म्हणे करा वडीलपणा दानासी ।
जेणें सुख होय सकळ हे जनासी ॥ ४ ॥
८
अवघे हरिजन मिळोनि आले राउळा ।
दोन्ही कर जोडोनि विनविती गोपाळा ॥ १ ॥
उठा पांडुरंगा हरिजना सांभाळी ।
पाहुं द्या वदन वंदूं पायांची धूळी ॥ २ ॥
उगवला दिनकर झाल्या निवळस दिशा ।
कोठवरी निद्रा आतां उठा परेशा ॥ ३ ॥
तुका म्हणे आम्ही उभे तिष्ठत द्वारासी ।
दोन्ही कर जोडोनि गाई गोपाळ सेवेसी ॥ ४ ॥
९
तुझिये निढळीं कोटी चंद्र प्रकाशे ।
कमल नयन हास्य वदन हांसे ॥ १ ॥
हाल कां रे कृष्णा डोल कां रे ।
घडिये घडिये घडिये गुज बोल कां रे ॥ २ ॥
उभा राहोनियां कैसा हालवितो बाहो ।
बाप रखुमादेविवरू विठ्ठलु नाहो ॥ ३ ॥
१०
भक्तीचिया पोटीं बोध काकडा ज्योती ।
पंचप्राण जीवें भावे ओवाळू आरती ॥ १ ॥
ओवांळू आरती माझ्या पंढरीनाथा ।
दोन्ही कर जोडोनि चरणीं ठेवीन माथा ॥ २ ॥
काय महिमा वर्णू आतां सांगणे किती ।
कोटी ब्रह्महत्या मुख पाहतां जाती ॥ ३ ॥
राही रखुमाई दोही दो बाहीं ।
मयूर पिच्छ चामरें ढाळिती ठायीं ठायीं ॥ ४ ॥
तुका म्हणे दीप घेऊनी उन्मन ती शोभा ।
विटेवरी उभा लावण्यगाभा ॥ ५ ॥