ये दशे चरित्र केलें नारायणें । रांगतां गोधनें राखिताहे ॥१॥
हें सोंग सारिलें या रुपें या रुपें अनंतें । पुढेंहि बहुते करणें आहे ॥२॥
आहे तुका म्हणे धर्म संस्थापनें । केला नारायणें अवतार ॥३॥
*
मेळवुनि सगळे गोपाळ । कांहीं करिती विचार ॥१॥
चला जाऊं चोरुं लोणी । आजि घेऊं चंद्रधणी ॥२॥
वेळ लावियेला अझुनी । काय करितां गडे हो ॥३॥
वाट काढिली गोविंदी । मागें गोपाळांची मांदी ॥४॥
अवघाचि वावरे । कळो नेदी कोणा खरे ॥५॥
घर पाहोनी एकांताचे । नवविधा नवनीताचें ॥६॥
रिघे आपण भीतरी । पुरवी माथुलियाच्या हरी ॥७॥
बोलो नेदी म्हणे स्थिर । खुणा दावी खा रे क्षीर ॥८॥
जोगावल्यावरी । तुका करितो चाकरी ॥९॥
*
याल तर या रे लागें । अवघें माझ्या मागें मागें ॥१॥
आजि देतों पोटभरी । पुरे म्हणाल तोंवरी ॥२॥
हळूं हळूं चला । कोणी कोणाशीं न बोला ॥३॥
तुका म्हणे सांडा घाटे । तेणें नका भरुं पोटें ॥४॥
*
शिंकें लावियेलें दुरी । होतो तिघांचें मी वरी ॥१॥
तुम्ही व्हा रे दोहींकडे । मुख पसरुनी गडे ॥२॥
वाहाती त्या धारा । घ्या रे दोहींच्या कोंपरा ॥३॥
तुका म्हणे हातीं टोका । अधिक उणें नेदी एका ॥४॥
*
पळाले ते भ्याड । त्यांसी येथें झाला नाड ॥१॥
धाट घेती धणीवरी । शिंकी उतरितो हरी ॥२॥
आपुलिया प्रती । पडलीं विचारीती रितीं ॥३॥
तुका लागे ध्या रे पायां । कैं पावाल या ठाया ॥४॥
*
धालें मग पोट । केला गाड्यांनीं बोभाट ॥१॥
ये रे ये रे नारायणा । बोलों अबोलण्या खुणा ॥२॥
खांद्यावरी भार । ती शिणत्ती बहू फ़ार ॥३॥
तुकयाच्या दातारे । नेली सुखीं केलीं पोरें ॥४॥
*
पाहाती गौळणी । तंव ती पालथीं दुधाणीं ॥१॥
म्हणती नंदाचिया पोरें । आजि चोरी केली खरें ॥२॥
त्याविण हे नासी । नव्हे दुसरीया ऎसी ॥३॥
सवें तुक्या मेला । त्यानें अगुणा आणिला ॥४॥
*
आतां ऎसें करुं । दोघां धरुनियां मारुं ॥१॥
मग टाकिती हे खोडी । तोंडी लागलीसे गोडी ॥२॥
कोंडू घरामधीं । न बोलोनी जागो बुद्धी ॥३॥
बोलावितो देवा । तुका गडियांचा मेळावा ॥४॥
*
चला वळूं गाई । बैसों जेऊं एके ठायीं ॥१॥
बहु केली वणवण । पायपिटी झाली सिण ॥२॥
खांदी भार पोटीं भूक । काय खेळायांचे सुख ॥३॥
तुका म्हणे धांवे । मग अवघें बरवे ॥४॥
*
अवघ्या सोडियेल्या मोटा । आजिचा दहींकाला गोमटा ॥१॥
घ्या रे घ्या रे दहींभात । आम्हा देतों पंढरीनाथ ॥२॥
मुदा घेऊनियां करीं । पेंधा वाटितो शिदोरी ॥३॥
भानुदास गीतीं गात । प्रसाद देतो पंढरीनाथ ॥४॥
*
घ्या रे भोकरें भाकरी । दहीभाताची शिदोरी । ताक सांडा दुरी । असेल तें तयापें ॥१॥
येथे घ्यावें तैसें द्यावें । थोडें परी निरें व्हावें । सागतों रे ठावें । असो द्या रे सकळां ॥२॥
माझें आहे तैसें पाहें । नाहीं तरी घरा जाये । चोरोनिया माये । नवनीत आणावें ॥३॥
तुका म्हणे घरीं । माझे कोणी नाहीं हरी । नका करुं दुरी । मज पायां वेगळे ॥४॥
*
काल्याचिये आसे । देव जळीं झाले मासे । पुसोनिया हांसे । टिरीसांगातें हात ॥१॥
लाजे त्यासी वांटा नाहीं । जाणें अंतरींचें तेहीं । दान होतां कांही । होऊं नेदी वेगळे ॥२॥
उपाय अपाय यापुढें । खोटे निवडितां कुडें । जोडुनिया पुढें । हात उभे नुपेक्षी ॥३॥
तें घ्या रे सावकाशे । जया फ़ावेल तो तसें । तुका म्हणे रसें । प्रेमाचिया आनंदे ॥४॥
*
आजि ओस अमरावतीं । काला पाहावया येती । देव विसरती । देहभाव आपुला ॥१॥
आनंद न समाये मेदिनी । चारा विसरल्या पाणी । तटस्थ त्या ध्यानीं । गाई झाल्या श्वापदें ॥२॥
जे या देवांचे दैवत । उभे असे या रंगात । गोपाळांसहित । क्रिडा करी कान्होबा ॥३॥
तया सुखाची शिराणी । तींच पाऊलें मेदिनी । तुका म्हणॆ मुनी । धुंडितां न लभती ॥४॥
*
चला बाई पांडुरंग पाहूं वाळवंटीं । मांडियेला काला भोवती गोपाळांची दाटी ॥१॥
आनंदें कवळ देती एका मुखीं एक । न म्हणती सान थोर अवघीं सकळीक ॥२॥
हमामा हुंबरी पांवा वाजवितो मोहरी । घेतलासे फ़ेर माजी घालुनियां हरी ॥३॥
लुब्धल्या नारी नर अवघ्या पशुयाती । विसरली देहभाव शंका नाहीं चित्तीं ॥४॥
पुष्पांचा वर्षाव झाली आरतियांची दाटी । तुळसी गुंफ़ोनियां माळा घालतील कंठी ॥५॥
यादवांचा राणा मनोहर कान्हा । तुका म्हणॆ सुख वाटे देखोनिया मना ॥६॥
*
कंठीं धरिला कृष्णमणी । अवघा जनी प्रकाश ॥१॥
काला वाटूं एकमेकां । वैष्णव निका सम्भ्रम ॥२॥
वाकुलिया ब्रह्मादिकां । उत्तम लोका दाखवूं॥३॥
तुका म्हणे भूमंडळी । आम्ही बळी वीर गाढे ॥४॥
*
उपजोनियां पुढती येऊं । काला खाऊं दही भात ॥१॥
वैकुंठी तो ऎसे नाहीं । कवळ कांहीं काल्याचे ॥२॥
एकमेकां देऊं मुखीं । सुखीं घालूं हुंबरी ॥३॥
तुका म्हणे वाळवंट । बरवे नीट उत्तम ॥४॥
*
आतां हेंचि जेऊं । सवें घेऊं सिदोरी ॥१॥
हरिनामाचा खिचडी काला । प्रेम मोहिला साधनें ॥२॥
चवीं चवीं घेऊं घास । ब्रह्मरस आवडी ॥३॥
तुका म्हणॆ गोड लागे । तों तों मागे रसना ॥४॥
*
चुराचुराकर माखन खाया । गौलनका नन्द कुमर कन्हैया ॥१॥
काहे बराई दिखावत मोही । जानतहुं प्रभुपन तेरा सबही ॥२॥
और बात सुन उखलसुगला । बंधलिया आपना तूं गोपाला ॥३॥
फ़ेरत बन बन गाऊं धरावत । कहे तुकयाबन्धु लकरी ले ले हात ॥४॥