भुमिदाने होसी भूमिपाळू । कनकदाने कांति निर्मळू । चंदनदाने सदा शीतळु । जन्मोजन्मी । प्राणिया ॥१॥
अन्नदाने दृढायुष्यी । उदकदाने सदासुखी । मंदिरदाने भुवनपालखी । सुपरिमलु उपचार ॥२॥
वस्त्रदाने सुंदरपण । तांबुंलदाने मनुष्यपण । ज्ञानदाने ब्राह्माणपण । अतिलावण्य़ सुंदरता ॥३॥
जे वृक्ष लाविती सर्वकाळ । तयांवरी शास्त्रांचे झल्लाळ । जे ईश्र्वरी अर्पिता फ़ळ । पुत्रवंत होऊनि नांदती ॥४॥
ऎशा दानांच्या पंक्ति । वेगळाल्या सांगो किती । एका ध्या रे लक्ष्मीपती । विष्णुदास नामा म्हणे ॥५॥