विष्णु स्तोत्रे

विष्णू हि सर्वोच्च शक्ती असून, त्रिमूर्ती ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांपैकी, भगवान विष्णूचे कार्य विश्वाचा सांभाळ आणि प्रतिपाळ करणे आहे.या विश्वात जेव्हा जेव्हा राक्षसी शक्ती मानवास त्रासदायक होतात,तेव्हा श्रीविष्णू अवतार घेऊन त्यांचा नाश करतात.विष्णूचे अवतार दहा-मत्स्य, कूर्म, वराह, नरसिंह, वामन, परशुराम, राम, कृष्ण, बुद्ध आणि कल्की. ज्या ज्या वेळेस विष्णूने पृथ्वीवर अवतार घेतला त्या त्या वेळेस त्यांची पत्नी लक्ष्मीनेही अवतार घेतला, रामावतरात सीता तर कृष्णावतारात रुख्मिणी. कृष्णावतारात भगवानांनी अर्जुनाला गीता सांगितली, ज्यात जीवनातील अंतीम सत्य आहे.विष्णूला नारायण म्हणूनही संबोधतात.विष्णूचे वास्तव्य क्षीरसागरात शेशनागावर आहे. त्याचे वाहन गरूड आहे.चार हातात शंख, चक्र, गदा, पद्म आहेत.समुद्रमंथनात अमृत मिळाले असता मोहिनी रूप घेऊन ते त्यांनी देवांना मिळवून दिले.


लक्ष्मीनृसिंह स्तोत्रम्

नरसिंह रमेश कृपा जलधे
सुरवैरि हिरण्य विदारणतः
नरलोक हितार्दरतस्सततम्
विजयीभव यादगिरीश विभो! ॥१॥
करुणारसपूर विधेयतयाऽ
सुरबालक बाधनिवारणतः
सममेव विदारितवानसुरम्
विजयीभव यादगिरीश विभो! ॥२॥
नरकेसरि रूपनिरूपणतः
सुरशेखर रूप निरूपकताम्
गमयन् शमयन् नरलोकरुजम्
विजयीभव यादगिरीश विभो! ॥३॥
जनताभिमतार्पण शीलपते
भवभीत समुद्धरणैकमते
सुरनायक नायक लोकपते
विजयीभव यादगिरीश विभो! ॥४॥
नरलोकभयानक रूपमिदम्
प्रधितम् रचयन् नरलोकभियाम्
सकलस्यतु शांति करोभिमतः
विजयीभव यादगिरीश विभो! ॥५॥
अवतार गणेश्वति चित्रपदम्
नरकेसरि मिश्रित रूपमिदम्
प्रकटीकुरुतेऽघटिते घटनाम्
तवदिव्यविधाम् नरसिंह विभो! ॥६॥
करुणाकलयाखिल लोकमिदम्
सकलार्थ समृद्धि रमाभरणम्
कलयन् जनिकारणकारणभो
विजयीभव यादगिरीश विभो! ॥७॥
पिताश्रीनृसिंहः विभुश्रीनृसिंहः
गतिश्रीनृसिंहः धनम् श्रीनृसिंहः
भजेश्रीनृसिंहम् भजे श्रिनृसिंहम्
नृसिंहम् भजे यादशैलेशमीशम् ॥८॥
नमेज्ञानमात्यंतिको भक्तिभावः
नमेसाधुचर्यात्वमेवासि सर्वम्
इतीवापिविश्वास ऐषः त्वदीयः
त्वदीयोप्यहम् सर्वमेवम् त्वदीयम् ॥९॥
त्वदीयेसमस्ते मदीयत्वभावात्
चिरात्संभृतात् मोहितोनाथसत्यम्
इदानीम् तु लक्ष्मीशसेवाविशेषात्
निरस्तम् हि मे मोहजातम् समस्तम् ॥१०॥
अजानतामयानाथ! जन्मकोटिशतैरपि
कृतानि सर्वपापानि क्षंतव्यानि दयामय ॥११॥
॥इति श्री वांगीपुरम् नरसिंहाचार्य विरचितं
श्री यादगिरि लक्ष्मीनृसिंह स्तोत्रम् समाप्तम् ॥