विष्णु स्तोत्रे

विष्णू हि सर्वोच्च शक्ती असून, त्रिमूर्ती ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांपैकी, भगवान विष्णूचे कार्य विश्वाचा सांभाळ आणि प्रतिपाळ करणे आहे.या विश्वात जेव्हा जेव्हा राक्षसी शक्ती मानवास त्रासदायक होतात,तेव्हा श्रीविष्णू अवतार घेऊन त्यांचा नाश करतात.विष्णूचे अवतार दहा-मत्स्य, कूर्म, वराह, नरसिंह, वामन, परशुराम, राम, कृष्ण, बुद्ध आणि कल्की. ज्या ज्या वेळेस विष्णूने पृथ्वीवर अवतार घेतला त्या त्या वेळेस त्यांची पत्नी लक्ष्मीनेही अवतार घेतला, रामावतरात सीता तर कृष्णावतारात रुख्मिणी. कृष्णावतारात भगवानांनी अर्जुनाला गीता सांगितली, ज्यात जीवनातील अंतीम सत्य आहे.विष्णूला नारायण म्हणूनही संबोधतात.विष्णूचे वास्तव्य क्षीरसागरात शेशनागावर आहे. त्याचे वाहन गरूड आहे.चार हातात शंख, चक्र, गदा, पद्म आहेत.समुद्रमंथनात अमृत मिळाले असता मोहिनी रूप घेऊन ते त्यांनी देवांना मिळवून दिले.


विष्णुस्तुतिः ब्रह्मोक्त नरसिंहपुऱाणे

ब्रह्मोवाच
नमः क्षीराब्धिवासाय नागपर्यङ्कशायिने ।
नमः श्रीकरसंस्पृष्टदिव्यपादाय विष्णवे ॥१५॥
नमस्ते योगनिद्राय योगान्तर्भाविताय च ।
तार्क्ष्यासनाय देवाय गोविन्दाय नमो नमः ॥१६॥
नमः क्षीराब्धिकल्लोलस्पृष्टमात्राय शार्ङ्गिणे ।
नमोऽरविन्दपादाय पद्मनाभाय विष्णवे ॥१७॥
भक्तार्चितसुपादाय नमो योगप्रियाय वै ।
शुभाङ्गाय सुनेत्राय माधवाय नमो नमः ॥१८॥
सुकेशाय सुनेत्राय सुललाटाय चक्रिणे ।
सुवक्त्राय सुकर्णाय श्रीधराय नमो नमः ॥१९॥
सुवक्षसे सुनाभाय पद्मनाभाय वै नमः ।
सुभ्रुवे चारुदेहाय चारुदन्ताय शार्ङ्गिणे ॥२०॥
चारुजङ्घाय दिव्याय केशवाय नमो नमः ।
सुनखाय सुशान्ताय सुविद्याय गदाभृते ॥२१॥
धर्मप्रियाय देवाय वामनाय नमो नमः ।
असुरघ्नाय चोग्राय रक्षोघ्नाय नमो नमः ॥२२॥
देवानामार्तिनाशाय भीमकर्मकृते नमः ।
नमस्ते लोकनाथाय रावणान्तकृते नमः ॥२३॥

इति ।

अध्याय ४७ श्लोक १५२३, अध्याय श्लोक संख्या १५९