विष्णु स्तोत्रे

विष्णू हि सर्वोच्च शक्ती असून, त्रिमूर्ती ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांपैकी, भगवान विष्णूचे कार्य विश्वाचा सांभाळ आणि प्रतिपाळ करणे आहे.या विश्वात जेव्हा जेव्हा राक्षसी शक्ती मानवास त्रासदायक होतात,तेव्हा श्रीविष्णू अवतार घेऊन त्यांचा नाश करतात.विष्णूचे अवतार दहा-मत्स्य, कूर्म, वराह, नरसिंह, वामन, परशुराम, राम, कृष्ण, बुद्ध आणि कल्की. ज्या ज्या वेळेस विष्णूने पृथ्वीवर अवतार घेतला त्या त्या वेळेस त्यांची पत्नी लक्ष्मीनेही अवतार घेतला, रामावतरात सीता तर कृष्णावतारात रुख्मिणी. कृष्णावतारात भगवानांनी अर्जुनाला गीता सांगितली, ज्यात जीवनातील अंतीम सत्य आहे.विष्णूला नारायण म्हणूनही संबोधतात.विष्णूचे वास्तव्य क्षीरसागरात शेशनागावर आहे. त्याचे वाहन गरूड आहे.चार हातात शंख, चक्र, गदा, पद्म आहेत.समुद्रमंथनात अमृत मिळाले असता मोहिनी रूप घेऊन ते त्यांनी देवांना मिळवून दिले.


तीर्थस्नानफलप्रदम्

वागुवाच
स्तोत्रेणानेन विप्रेन्द्र स्तुहि नारायणं प्रभुम् ।
नान्यथा सर्वतीर्थानां फलं प्राप्स्यसि सुव्रत ॥१॥
मार्कण्डेय उवाच
तदेवाख्याहि भगवन् स्तोत्रं तीर्थफलप्रदम् ।
येन जप्तेन सकलं तीर्थस्नानफलं लभेत् ॥२॥
वागुवाच
जय जय देवदेव जय माधव केशव ।
जय पद्मपलाशाक्ष जय गोविन्द गोपते ॥३॥
जय जय पद्मनाभ जय वैकुण्ठ वामन ।
जय पद्म हृषीकेश जय दामोदराच्युत ॥४॥
जय पद्मेश्वरानन्त जय लोकगुरो जय ।
जय शङ्खगदापाणे जय भूधरसूकर ॥५॥
जय यज्ञेश वाराह जय भूधर भूमिप ।
जय योगेश योगज्ञ जय योगप्रवर्त्तक ॥६॥
जय योगप्रवर्तक जय धर्मप्रवर्त्तक ।
कृतप्रिय जय जय यज्ञेश यज्ञाङ्ग जय ॥७॥
जय वन्दितसद्द्विज जय नारदसिद्धिद ।
जय पुण्यवतां गेह जय वैदिकभाजन ॥८॥
जय जय चतुर्भुज श्री जयदेव जय दैत्यभयावह ।
जय सर्वज्ञ सर्वात्मन् जय शंकर शाश्वत ॥९॥
जय विष्णो महादेव जय नित्यमधोक्षज ।
प्रसादं कुरु देवेश दर्शयाद्य स्वकां तनुम् ॥१०॥


श्रीनरसिंहपुराणे मार्कण्डेयचरित्रे दशमोऽध्यायः ॥१०॥