विष्णु स्तोत्रे

विष्णू हि सर्वोच्च शक्ती असून, त्रिमूर्ती ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांपैकी, भगवान विष्णूचे कार्य विश्वाचा सांभाळ आणि प्रतिपाळ करणे आहे.या विश्वात जेव्हा जेव्हा राक्षसी शक्ती मानवास त्रासदायक होतात,तेव्हा श्रीविष्णू अवतार घेऊन त्यांचा नाश करतात.विष्णूचे अवतार दहा-मत्स्य, कूर्म, वराह, नरसिंह, वामन, परशुराम, राम, कृष्ण, बुद्ध आणि कल्की. ज्या ज्या वेळेस विष्णूने पृथ्वीवर अवतार घेतला त्या त्या वेळेस त्यांची पत्नी लक्ष्मीनेही अवतार घेतला, रामावतरात सीता तर कृष्णावतारात रुख्मिणी. कृष्णावतारात भगवानांनी अर्जुनाला गीता सांगितली, ज्यात जीवनातील अंतीम सत्य आहे.विष्णूला नारायण म्हणूनही संबोधतात.विष्णूचे वास्तव्य क्षीरसागरात शेशनागावर आहे. त्याचे वाहन गरूड आहे.चार हातात शंख, चक्र, गदा, पद्म आहेत.समुद्रमंथनात अमृत मिळाले असता मोहिनी रूप घेऊन ते त्यांनी देवांना मिळवून दिले.


श्रीमदच्युताष्टकम्‌

श्रीगणेशाय नम: ॥ अच्युताच्युत हरे परमात्मन् राम कृष्ण पुरुषोत्तम विष्णो ।

वासुदेव भगवन्ननिरुद्ध श्रीपते शमय दु:खमशेषम् ॥ १ ॥

विश्वमंगल विभो जगदीश नंदनंदन नृसिंहनरेन्द्र । मुक्तिदायक मुकुंद मुरारे श्रीपते शमय दु:खमशेषम् ॥ २ ॥

रामचंद्र रघुनायक देव दीननाथ दुरितक्षयकारिन् । यादवेन्द्र यदुभूषण यज्ञ श्रीमते शमय दु:खमशेषम् ॥ ३ ॥

देवकीतनय दु:खदवाग्ने राधिकारमण रम्यसुमूर्ते । दु:खमोचन दयार्णव नाथ श्रीपते शमय दु:खमशेषम् ॥ ४ ॥

गोपिकावदनचंद्रचकोर नित्य निर्गुण निरंजन जिष्णो । पूर्णरूप जयशंकर शर्व श्रीपते शमय दु:खमशेषम् ॥ ५ ॥

गोकुलेश गिरिधारणधीर यामुनाच्छतटखेलनवीर । नारदादिमुनिवंदितपाद श्रीपते शमय दु:खमशेषम् ॥ ६ ॥

द्वारकाधिप दुरंतगुणाब्धे प्राणनाथ परिपूर्ण भवारे । ज्ञानगम्यगुणसागरब्रह्मन् श्रीपते शमय दु:खमशेषम् ॥ ७ ॥

दुष्टनिर्दलन देवदयालो पद्मनाभधरणीधर धर्मिन् । रावणांतक रमेश मुरारे श्रीपते शमय दु:खमशेषम् ॥ ८ ॥

अच्युताष्टकमिदं रमणीयं निर्मितं भवभयं विनिहंतुम् । य: पठेद्विषयवृत्तिनिवृत्तिजन्मदु:खमखिलं स जहाति ॥ ९ ॥

इति श्रीशंकराचार्यविरचितमच्युताष्टकस्तोत्रं समाप्तम् ॥