विष्णु स्तोत्रे

विष्णू हि सर्वोच्च शक्ती असून, त्रिमूर्ती ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांपैकी, भगवान विष्णूचे कार्य विश्वाचा सांभाळ आणि प्रतिपाळ करणे आहे.या विश्वात जेव्हा जेव्हा राक्षसी शक्ती मानवास त्रासदायक होतात,तेव्हा श्रीविष्णू अवतार घेऊन त्यांचा नाश करतात.विष्णूचे अवतार दहा-मत्स्य, कूर्म, वराह, नरसिंह, वामन, परशुराम, राम, कृष्ण, बुद्ध आणि कल्की. ज्या ज्या वेळेस विष्णूने पृथ्वीवर अवतार घेतला त्या त्या वेळेस त्यांची पत्नी लक्ष्मीनेही अवतार घेतला, रामावतरात सीता तर कृष्णावतारात रुख्मिणी. कृष्णावतारात भगवानांनी अर्जुनाला गीता सांगितली, ज्यात जीवनातील अंतीम सत्य आहे.विष्णूला नारायण म्हणूनही संबोधतात.विष्णूचे वास्तव्य क्षीरसागरात शेशनागावर आहे. त्याचे वाहन गरूड आहे.चार हातात शंख, चक्र, गदा, पद्म आहेत.समुद्रमंथनात अमृत मिळाले असता मोहिनी रूप घेऊन ते त्यांनी देवांना मिळवून दिले.


अच्युताष्टकम्

श्रीगणेशायनम: ॥ अच्युतं केशवं विष्णुं हरिं सत्यं जनार्दनम् । हंसं नारायणं चैवमेतन्नामाष्टकं पठेत् ॥ १ ॥

त्रिसंध्यं य: पठेन्नित्यं दारिद्र्यं तस्य नश्यति । शत्रुसैन्यं क्षयं याति दु:स्वप्न: सुखदो भवेत् ॥ २ ॥

गंगायां मरणं चैव दृढाभक्तिस्तु केशवे । ब्रह्मविद्याप्रबोधश्च तस्मान्नित्यं पठेन्नर: ॥ ३ ॥

इति श्रीवामनपुराणे विष्णोर्नामाष्टकस्तोत्रं संपूर्णम्