विष्णु स्तोत्रे

विष्णू हि सर्वोच्च शक्ती असून, त्रिमूर्ती ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांपैकी, भगवान विष्णूचे कार्य विश्वाचा सांभाळ आणि प्रतिपाळ करणे आहे.या विश्वात जेव्हा जेव्हा राक्षसी शक्ती मानवास त्रासदायक होतात,तेव्हा श्रीविष्णू अवतार घेऊन त्यांचा नाश करतात.विष्णूचे अवतार दहा-मत्स्य, कूर्म, वराह, नरसिंह, वामन, परशुराम, राम, कृष्ण, बुद्ध आणि कल्की. ज्या ज्या वेळेस विष्णूने पृथ्वीवर अवतार घेतला त्या त्या वेळेस त्यांची पत्नी लक्ष्मीनेही अवतार घेतला, रामावतरात सीता तर कृष्णावतारात रुख्मिणी. कृष्णावतारात भगवानांनी अर्जुनाला गीता सांगितली, ज्यात जीवनातील अंतीम सत्य आहे.विष्णूला नारायण म्हणूनही संबोधतात.विष्णूचे वास्तव्य क्षीरसागरात शेशनागावर आहे. त्याचे वाहन गरूड आहे.चार हातात शंख, चक्र, गदा, पद्म आहेत.समुद्रमंथनात अमृत मिळाले असता मोहिनी रूप घेऊन ते त्यांनी देवांना मिळवून दिले.


श्रीहरिनामाष्टकम्

श्रीगणेशाय नम: ॥

श्रीकेशवाच्युत मुकुन्द रथांगपाणे गोविन्द माधव जनार्दन दानवारे ।

नारायणामरपते त्रिजगन्निवास जिह्वे

जपेति सततं मधुराक्षराणि ॥ १ ॥

श्रीदेवदेव मधुसूदन शार्ङ्गपाणे दामोदरार्णवनिकेतन कैटभारे ।

विश्वंभराभरणभूषित भूमिपाल जिह्वे ० ॥ २ ॥

श्रीपद्मलोचन गदाधर पद्मनाभ पद्मेश पद्मपद पावन पद्मपाणे ।

पीतांबरांबररुचे रुचिरावतार जिह्वे ० ॥ ३ ॥

श्रीकांत कौस्तुभधरार्तिहराब्जपाणे विष्णो त्रिविक्रममहीधर धर्मसेतो ।

वैकुण्ठवास वसुधाधिप वासुदेव जिह्वे ० ॥ ४ ॥

श्रीनारसिंह नरकांतक कांतमूर्ते लक्ष्मीपते गरुडवाहन शेषशायिन् ।

केशिप्रणाशन सुकेश किरीटमौले जिह्वे ० ॥ ५ ॥

श्रीवत्सलाञ्छन सुरर्षभ शंखपाणे कल्पांतवारिधिविहार हरे मुरारे ।

यज्ञेश यज्ञमय यज्ञभुगादिदेव जिह्वे ० ॥ ६ ॥

श्रीराम रावणरिपो रघुवंशकेतो सीतापते दशरथात्मज राजसिंह ।

सुग्रीवमित्र मृगवेधन चापपाणे जिह्वे ० ॥ ७ ॥

श्रीकृष्ण वृष्णिवर यादव राधिकेश गोवर्द्धनोद्धरण कंसविनाश शौरे ।

गोपाल वेणुधर पांडुसुतैकबंधो जिह्वे ० ॥ ८ ॥

इत्यष्टकं भगवत: सततं नरो यो नामाङ्कितं पठति नित्यमनन्यचेता: ।

विष्णो: परं पदमुपैति पुनर्न जातु मातु: पयोधररसं पिबतीह सत्यम् ॥ ९ ॥

इति श्रीपरमहंसस्वामि ब्रह्मानंदविरचितं श्रीहरिनामाष्टकं सम्पूर्णम्‌