विष्णु स्तोत्रे

विष्णू हि सर्वोच्च शक्ती असून, त्रिमूर्ती ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांपैकी, भगवान विष्णूचे कार्य विश्वाचा सांभाळ आणि प्रतिपाळ करणे आहे.या विश्वात जेव्हा जेव्हा राक्षसी शक्ती मानवास त्रासदायक होतात,तेव्हा श्रीविष्णू अवतार घेऊन त्यांचा नाश करतात.विष्णूचे अवतार दहा-मत्स्य, कूर्म, वराह, नरसिंह, वामन, परशुराम, राम, कृष्ण, बुद्ध आणि कल्की. ज्या ज्या वेळेस विष्णूने पृथ्वीवर अवतार घेतला त्या त्या वेळेस त्यांची पत्नी लक्ष्मीनेही अवतार घेतला, रामावतरात सीता तर कृष्णावतारात रुख्मिणी. कृष्णावतारात भगवानांनी अर्जुनाला गीता सांगितली, ज्यात जीवनातील अंतीम सत्य आहे.विष्णूला नारायण म्हणूनही संबोधतात.विष्णूचे वास्तव्य क्षीरसागरात शेशनागावर आहे. त्याचे वाहन गरूड आहे.चार हातात शंख, चक्र, गदा, पद्म आहेत.समुद्रमंथनात अमृत मिळाले असता मोहिनी रूप घेऊन ते त्यांनी देवांना मिळवून दिले.


रमापत्यष्टकम्

श्रीगणेशाय नम: ॥

जगदादिमनादिमजं पुरुषं शरदंबरतुल्यतनुं वितनुम् ।

धृतकंजरथांगगदं विगदं प्रणमामि रमाधिपतिं तमहम् ॥ १ ॥

कमलाननकंजरतं विरतं ह्रदि योगिजनै: कलितं ललितम् । कुजनै: सुजनैरलभं सुलभं प्रण० ॥ २ ॥

मुनिवृन्दह्रदिस्थपदं सुपदं निखिलाध्वरभागभुजं सुभुजम् । ह्रतवासवमुख्यमदं विमदं प्रण० ॥ ३ ॥

ह्रतदानवदृप्तबलं सुबलं स्वजनास्तसमस्तमलं विमलम् । समपास्त गजेंद्रदरं सुंदरं प्रण० ॥ ४ ॥

परिकल्पितसर्वकलं विकलं सकलागमगीतगुणं विगुणम् । भवपाशनिराकरणं शरणं प्रण० ॥ ५ ॥

मृतिजन्मजराशमनं कमनं शरणागतभीतिहरं दहरम् । परितुष्टरमाह्रदयं सुदयं प्रण० ॥ ६ ॥

सकलावनिबिंबधरं स्वधरं परिपूरितसर्वदिशं सुदृशम् । गतशोकमशोककरं सुकरं प्रण० ॥ ७ ॥

मथितार्णवराजरसं सरसं ग्रथिताखिललोकह्रदं सुह्रदम् । प्रथिताद्‌भुतशक्तिगणं सुगणं प्रण० ॥ ८ ॥

सुखराशिकरं भवबंधहरं परमाष्टकमेतदनन्यमति: ।

पठतीह तु योऽनिशमेव नरो लभते खलु विष्णुपदं स परम् ॥ ९ ॥

इति श्रीपरमहंसस्वामि ब्रह्मानंदविरचितं श्रीरमापत्यष्टकं सम्पूर्णम् ॥