विष्णु स्तोत्रे

विष्णू हि सर्वोच्च शक्ती असून, त्रिमूर्ती ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांपैकी, भगवान विष्णूचे कार्य विश्वाचा सांभाळ आणि प्रतिपाळ करणे आहे.या विश्वात जेव्हा जेव्हा राक्षसी शक्ती मानवास त्रासदायक होतात,तेव्हा श्रीविष्णू अवतार घेऊन त्यांचा नाश करतात.विष्णूचे अवतार दहा-मत्स्य, कूर्म, वराह, नरसिंह, वामन, परशुराम, राम, कृष्ण, बुद्ध आणि कल्की. ज्या ज्या वेळेस विष्णूने पृथ्वीवर अवतार घेतला त्या त्या वेळेस त्यांची पत्नी लक्ष्मीनेही अवतार घेतला, रामावतरात सीता तर कृष्णावतारात रुख्मिणी. कृष्णावतारात भगवानांनी अर्जुनाला गीता सांगितली, ज्यात जीवनातील अंतीम सत्य आहे.विष्णूला नारायण म्हणूनही संबोधतात.विष्णूचे वास्तव्य क्षीरसागरात शेशनागावर आहे. त्याचे वाहन गरूड आहे.चार हातात शंख, चक्र, गदा, पद्म आहेत.समुद्रमंथनात अमृत मिळाले असता मोहिनी रूप घेऊन ते त्यांनी देवांना मिळवून दिले.


संकष्टनाशनविष्णुस्तोत्रम्

श्रीगणेशाय नम: ॥ नारद उवाच । पुनर्दैत्यं समायान्तं दृष्ट्‍वा देवा: सवासवा: ॥ भयप्रकंपिता सर्वे विष्णुंस्तोतुं प्रचक्रमु: ॥ १ ॥

देवा ऊचु: ॥ नमो मत्स्यकुर्मादिनानास्वरूपै: सदा भक्‍तकार्योद्यतायार्तिहत्रे । विधात्रादिसर्गस्थितिध्वंसकर्त्रे गदाशंखपद्मारिहस्ताय तेऽस्तु ॥ २ ॥

रमावल्लभायासुराणां निहंत्रे भुजंगारियानाय पीतांबराय । मखादिक्रियापाककर्त्रे विकत्रे शरण्याय तस्मै नत: स्मो नता स्म: ॥ ३ ॥

नमो दैत्यसंतापितामर्त्यदु:खाचलध्वंसदंभोलये विष्णवे ते । भुजंगेशतल्पे शयायार्कचन्द्रद्विनेत्राय तस्मै नता: स्मो नता:स्म ॥ ४ ॥

नारद उवाच ॥ संकष्त नाशनं नाम स्तोत्रमेतत्पठेन्नर: । सकदाचिन्न संकष्टै: पीड्यते कृपया हरे: ॥ ५ ॥

इति श्री पद्मपुराणे सुरनारद संवादे संकष्टनाशनं नाम विष्णुस्तोत्रं सम्पूर्णम् ॥