विष्णु स्तोत्रे

विष्णू हि सर्वोच्च शक्ती असून, त्रिमूर्ती ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांपैकी, भगवान विष्णूचे कार्य विश्वाचा सांभाळ आणि प्रतिपाळ करणे आहे.या विश्वात जेव्हा जेव्हा राक्षसी शक्ती मानवास त्रासदायक होतात,तेव्हा श्रीविष्णू अवतार घेऊन त्यांचा नाश करतात.विष्णूचे अवतार दहा-मत्स्य, कूर्म, वराह, नरसिंह, वामन, परशुराम, राम, कृष्ण, बुद्ध आणि कल्की. ज्या ज्या वेळेस विष्णूने पृथ्वीवर अवतार घेतला त्या त्या वेळेस त्यांची पत्नी लक्ष्मीनेही अवतार घेतला, रामावतरात सीता तर कृष्णावतारात रुख्मिणी. कृष्णावतारात भगवानांनी अर्जुनाला गीता सांगितली, ज्यात जीवनातील अंतीम सत्य आहे.विष्णूला नारायण म्हणूनही संबोधतात.विष्णूचे वास्तव्य क्षीरसागरात शेशनागावर आहे. त्याचे वाहन गरूड आहे.चार हातात शंख, चक्र, गदा, पद्म आहेत.समुद्रमंथनात अमृत मिळाले असता मोहिनी रूप घेऊन ते त्यांनी देवांना मिळवून दिले.


नारायणस्तोत्रम्

श्रीगणेशाय नम: ॥

नारायण नारायण जय गोविंद हरे ।

नारयण० जय गोपाल हरे ॥ ध्रु० ॥

करुणापारावारा वरुणालयगम्भीरा । नारयण० ॥ १ ॥

घननीरदसंकाशा कृतकलिल्मषनाशा । नारयण० ॥ २ ॥

यमुनातीरविहारा धृतकौस्तुभमणिहारा । नारयण० ॥ ३ ॥

पीतांबरपरिधाना सुरकल्याणनिधाना । नारयण० ॥ ४ ॥

मंजुलगुंजाभूषा मायामानुषवेषा। नारयण० ॥ ५ ॥

राधाऽधरमधुरसिका रजनीकरकुलतिलका । नारयण० ॥ ६ ॥

मुरलीगानविनोदा वेदस्तुतभूपादा । नारयण० ॥ ७ ॥

बर्हिनिबर्हापीडा नटनाटकफणिपीडा । नारयण० ॥ ८ ॥

वारिजभूषाभरणा राजीवरुक्मिणीरमणा । नारयण० ॥ ९ ॥

जलरुहदलनिभनेत्रा जगदारंभकसूत्रा । नारयण० ॥ १० ॥

पातकरजनीसंहर करुणालय मामुद्धर । नारयण० ॥ ११ ॥

अघबकक्षयकंसारे केशव कृष्ण मुरारे । नारयण० ॥ १२ ॥

हाटकनिभपीतांबर अभयं कुरु मे मावर । नारयण० ॥ १३ ॥

दशरथराजकुमारा दानवमदसंहारा । नारयण० ॥ १४ ॥

गोवर्धनगिरिधरणा गोपीमानस हरणा । नारयण० ॥ १५ ॥

सरयूतीरविहारा सज्जनऋषिमंदारा । नारयण० ॥ १६ ॥

विश्वामित्रमखत्रा विविधपरसुचरित्रा । नारयण० ॥ १७ ॥

ध्वजवज्रांकुशपादा धरणीसुतसहमोदा । नारयण० ॥ १८ ॥

जनकसुताप्रतिपाला जय जय संस्मृतिलीला । नारयण० ॥ १९ ॥

दशरथवाग्धृतिभारा दण्डकवनसंचारा । नारयण० ॥ २० ॥

मुष्टिकचाणूरसंहारा मुनिमानसाविहारा । नारयण० ॥ २१ ॥

वालिविनिग्रहशौर्या वरसुग्रीवहितार्या । नारयण० ॥ २२ ॥

मां मुरलीकरधीवर पालय पालय श्रीधर । नारयण० ॥ २३ ॥

जलनिधिबंधनधीरा रावणकंठविदारा । नारयण० ॥ २४ ॥

ताटीमददलनाढया नटगुणविविधधनाढ्या । नारयण० ॥ २५ ॥

गौतमपत्नीपूजन करुणाघनावलोकन । नारयण० ॥ २६ ॥

सभ्रमसीताहारा साकेतपुरविहारा । नारयण० ॥ २७ ॥

अचलोद्‌धृति चंचत्कार भक्तानुग्रहतत्पर । नारयण० ॥ २८ ॥

नैगमगानविनादारक्ष:सुतप्रह्लादा । नारयण० ॥ २९ ॥

भारतियतिवरशंकर नामामृतमखिलांतर । नारयण० नारयण जप गोपाल हरे ॥ ३० ॥

इति श्रीमच्छंकराचार्यविरचितं नारायण स्तोत्र सम्पूर्णम् ॥