विष्णु स्तोत्रे

विष्णू हि सर्वोच्च शक्ती असून, त्रिमूर्ती ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांपैकी, भगवान विष्णूचे कार्य विश्वाचा सांभाळ आणि प्रतिपाळ करणे आहे.या विश्वात जेव्हा जेव्हा राक्षसी शक्ती मानवास त्रासदायक होतात,तेव्हा श्रीविष्णू अवतार घेऊन त्यांचा नाश करतात.विष्णूचे अवतार दहा-मत्स्य, कूर्म, वराह, नरसिंह, वामन, परशुराम, राम, कृष्ण, बुद्ध आणि कल्की. ज्या ज्या वेळेस विष्णूने पृथ्वीवर अवतार घेतला त्या त्या वेळेस त्यांची पत्नी लक्ष्मीनेही अवतार घेतला, रामावतरात सीता तर कृष्णावतारात रुख्मिणी. कृष्णावतारात भगवानांनी अर्जुनाला गीता सांगितली, ज्यात जीवनातील अंतीम सत्य आहे.विष्णूला नारायण म्हणूनही संबोधतात.विष्णूचे वास्तव्य क्षीरसागरात शेशनागावर आहे. त्याचे वाहन गरूड आहे.चार हातात शंख, चक्र, गदा, पद्म आहेत.समुद्रमंथनात अमृत मिळाले असता मोहिनी रूप घेऊन ते त्यांनी देवांना मिळवून दिले.


कमलापत्यष्टकम्

श्रीगणेशाय नम: ॥

भुजगतल्पगतं घनसुन्दरं गरुडवाहनमंबुजलोचनम् । नलिनचक्रगदाकरमव्ययं भजत रे मनुजा: कमलापतिम् ॥ १ ॥

अलिकुलासितकोमल कुन्तलं विमलपीतदुकूलमनोहरम् । जलधिजाश्रितवामकलेवरं भजत रे० ॥ २ ॥

किमुजपैश्च तपोभिरुताध्वरैरपि किमुत्ततीर्थनिषेवणै: । किमुत शास्त्रकदंबविलोकनैर्भजत० ॥ ३ ॥

मनुजदेहमिमं भुवि दुर्लभं समधिगम्य सुरैरपि वांछितम् । विषयलंपटतामपहाय वै भजत० ॥ ४ ॥

न वनिता न सुतो न सहोदरो न पिता जननी न च बांधव: । व्रजति साकमनेन जनेन वै भजत० ॥ ५ ॥

सकलमेव चलं सचराचरं जगदिदं सुतरां धनयौवनम् । समवलोक्य विवेकदृशा द्रुतं भजत० ॥ ६ ॥

विविधरोगयुतं क्षणभंगुरं परवश नव मार्गमलाकुलम् । परिनिरीक्ष्य शरीरमिदं स्वकं भजत० ॥ ७ ॥

मुनिवरैरनिश ह्रदि भावितं शिवविरंचि महेन्द्रनुतं सदा । मरणजन्मजराभयमोचनं भजत० ॥ ८ ॥

हरिपदाष्टकमेतदनुत्तमं परमहंसजनेन समीरितम् । पठति यस्तु समाहितचेतसा व्रजति विष्णुपदं स नरो ध्रुवम् ॥ ९ ॥

इति श्रीमत्परमहंसस्वामिब्रह्मानन्दविरचितं कमलापत्यष्टकं समाप्तम् ।