सप्तशती गुरूचरित्र

हे टेंबे स्वामी लिखित सप्तशती गुरुचरित्र आहे. त्याची एक खासियत आहे. प्रत्येक ओळीतील तिसरे अक्षर वाचत गेल्यास गीतेचा संपूर्ण पंधरावा अध्याय तयार होतो. श्री टेंबेस्वामींची अफाट प्रतिभा यातून दिसुन येते. श्रीसप्‍तशतीगुरुचरित्र वाचल्याने गुरूचरित्र वाचल्याचेच समाधान आणि पुण्य मिळते.


अध्याय तिसरा

ऐसें वेदधर्माख्यान । नामधारक ऐकून । पुसे कां हा देव असून । अवतरुन ये येथें ॥१॥

कां घे दशावतार हे । सिद्ध म्हणे ऐक तूं हें । अंबरीषाकरितां हें । नटन आहे नारायणा ॥२॥

दुर्वास ऋषी द्वादशीसी । आला अंबरीषापाशीं । लावी विलंब कर्मासी । हो मानसीं खिन्न भूप ॥३॥

टळे वेळा हें जाणून । राजा करी जलपान । गर्भवासा जा म्हणून । दे कोपून ऋषी शाप ॥४॥

तेव्हां दयाळु येऊन । स्वयें शाप स्वीकारुन । अवतरे नारायण । जो असोन सर्वव्यापी ॥५॥

इति श्री०प०वा०स० अंबरीषोपाख्यानं नाम तृतियो०