सप्तशती गुरूचरित्र

हे टेंबे स्वामी लिखित सप्तशती गुरुचरित्र आहे. त्याची एक खासियत आहे. प्रत्येक ओळीतील तिसरे अक्षर वाचत गेल्यास गीतेचा संपूर्ण पंधरावा अध्याय तयार होतो. श्री टेंबेस्वामींची अफाट प्रतिभा यातून दिसुन येते. श्रीसप्‍तशतीगुरुचरित्र वाचल्याने गुरूचरित्र वाचल्याचेच समाधान आणि पुण्य मिळते.


अध्याय आठवा

सिद्ध संक्षेपें सांगत । श्रीपाद तेथूनि येत । कृष्णातीरीं होयी स्थित । कुरुपुरांत तारक ॥१॥

मूर्ख प्रजासमवेत । लोकनिंदेनें हो त्रस्त । जीव द्याया कृष्णेंत । आकस्मात देखे देव ॥२॥

प्रभू तिला निरोपिती । आत्महत्या दुस्तर म्हणती । जन्मांतरीं सुपुत्राप्ती । व्हाया प्रार्थी मग ती नारी ॥३॥

तन्निष्ठा ओळखून । गुरु सांगती आख्यान । उज्जनींत चंद्रसेन । शिवार्चन करी प्रदोषीं ॥४॥

त्याचा अमूल्य सन्मणी । हराया नृप तत्क्षणीं । घेवोनी अक्षौहिणी । उज्जनी वेढिते ते ॥५॥

हस्त्यश्च रथ पत्ती । पाहोनी न भी चित्तीं । शिवा पूजी तो भूपती । तें देखती गोपपुत्र ॥६॥

अश्वत्थ संनिधानीं । अंगणी ते पाषाणीं । पूजिती, त्यां नेती जननी । पूजनीं रमे एक बाळ ॥७॥

राहे मेळा जातां एकला । पूजा लोटुनि माता त्याला । ओढी तो मूर्छित पडला । शिव त्याला दे सायुज्ज

पुढें नंदस्त्री होऊन । माता लाहे कृष्णनंदन । ज्योतिर्लिंग तें देखून । द्वेष सोडून जाती राजे ॥९॥

पुढें सुत व्हावा तरी । शनिप्रदोष तूं करीं । येरु म्हणे तुम्हासरी । जन्मांतरी पुत्र व्हावा ॥१०॥

जो भाविकां देई वर । तथा म्हणूनी शिरावर । मूर्खपुत्राच्या धरी कर । विद्वद्वर तो जाहला ॥११॥

ती करुनी प्रदोषपूजा । पुढें झाली विप्रात्मजा । स्वसमांन नाहीं दुजा । म्हणूनीं हो तस्तुत दत्त ॥१२॥

इति श्री०प०प०वा०स०वि०स०गु० शनिप्रदोषव्रतकथनं नाम अष्टमो०