सप्तशती गुरूचरित्र

हे टेंबे स्वामी लिखित सप्तशती गुरुचरित्र आहे. त्याची एक खासियत आहे. प्रत्येक ओळीतील तिसरे अक्षर वाचत गेल्यास गीतेचा संपूर्ण पंधरावा अध्याय तयार होतो. श्री टेंबेस्वामींची अफाट प्रतिभा यातून दिसुन येते. श्रीसप्‍तशतीगुरुचरित्र वाचल्याने गुरूचरित्र वाचल्याचेच समाधान आणि पुण्य मिळते.


अध्याय बारावा

सच्चित्परब्रह्म श्रवणा । न्यास हेतू तत्कारण । वैराग्य न क्रम जाण । आळस न कीजे येथ ॥१॥

कां वारिसी तूं मज । आयुष्य जेवीं वीज । क्षणभंगुर देह तुज । कळे सहज मृत्यू न कीं ॥२॥

येथ मानवांची काय । कथा मृत्यू देवां खाय । न ये गेलेलें आयुष्य । न कळे काय केव्हां पडे ॥३॥

सन्मार्गि न करीं विघ्न । सुपुत्रा तूं होसी म्हणून । मस्तकीं हस्त ठेऊन । पूर्वस्मरण तिला देई ॥४॥

म्हणे तनया श्रीपदा तूं । एक पुत्र होतां जा तूं । सुत म्हणे पुरतां हेतू । आज्ञा दे तूं म्हणूनी राहे ॥५॥

ज्यांचे व्यंग अध्ययन । जे म्हणविती प्राज्ञ । तेही त्यापाशीं येवून । अध्ययन करिती नित्य ॥६॥

ती माय गर्भिणी झाली । पुत्र दोन प्रसवली । त्या बाळें आज्ञा घेतली । वाढ धरिलीं काशीची ॥७॥

तो सस्मित बोले तयां । पुनः भेटें म्हणुनिया । काशीमध्यें येवोनियां । धरी धैर्या करी योग ॥८॥

महान्गतस्मय जाणून । न्यासमार्ग स्थापीं म्हणून । विप्रें प्रार्थितां तो प्राज्ञ । स्वयें संन्यासी होतसे ॥९॥

जो होता तेथें यती । वृद्ध कृष्णसरस्वती । तया वरुनी गुरु होती । नरसिंहसरस्वती ॥१०॥

होऊन नर आपण । गुरुचे गुरु असून । रामकृष्णापरी जाण । गुरु करुन घेती गुरु ॥११॥

स्थापूनि श्रौंतधर्म । फिरे सर्व तीर्थाश्रम । माधवा दे आश्रम । वळे जन्मभूमीकडे ॥१२॥

इति०श्री०प०प०वा०स० सारे संन्यासदीक्षाग्रहणं नाम द्वादसो०