सप्तशती गुरूचरित्र

हे टेंबे स्वामी लिखित सप्तशती गुरुचरित्र आहे. त्याची एक खासियत आहे. प्रत्येक ओळीतील तिसरे अक्षर वाचत गेल्यास गीतेचा संपूर्ण पंधरावा अध्याय तयार होतो. श्री टेंबेस्वामींची अफाट प्रतिभा यातून दिसुन येते. श्रीसप्‍तशतीगुरुचरित्र वाचल्याने गुरूचरित्र वाचल्याचेच समाधान आणि पुण्य मिळते.


अध्याय अठरावा

सुरेख क्षेत्र गुरु पाहे । कृष्णा पंचगंगा वाहे । तेथें द्वादशाब्द राहे । अजुनी आहे तेथें गुप्त ॥१॥

तेथें दुःखि विप्राघरीं । गुरु शाकभिक्षा करी । घेवडा वेल तोडी करीं । ब्राह्मणी करी दुःख तेव्हां ॥२॥

तद्‌दुःख हरावया । वेलातळीं देई तयां । धनकुंभ गुरुराया । म्हणे तया न प्रगटा हे ॥३॥

इति श्री०प०प०वा०स० सारे धनकुंभप्रदानं नाम अष्टादशो०