श्रीएकनाथी भागवत

ज्ञानेश्वरीतील उणीव एकनाथी भागवताने भरून काढली.


श्लोक ८ वा

 

राजोवाच--ब्रह्मण्यानां वदान्यानां नित्यं वृद्धोपसेविनाम् ।

विप्रशापः कथमभूद् वृष्णीनां कृष्णचेतसाम् ॥८॥

आदरें पुसे परीक्षिती । यादव विनीत विप्रभक्तीं ।

त्यांसि शापु घडे कैशिया रीतीं । सांग तें मजप्रती शुकयोगींद्रा ॥७७॥

यादव दानें अतिउदार । राजे होऊनि परम पवित्र ।

ब्राह्मणसेवे तत्पर । आज्ञाधर कृष्णाचे ॥७८॥

यादव सदा कृष्णयोगेंसीं । नित्य साधु यादवांपासीं ।

तेथेंचि वसे नारदऋषी । शापु यादवांसी घडे कैसा ॥७९॥

दक्षशाप न बाधी कृष्णापासीं । म्हणौनि नारद वसे द्वारकेसी ।

तोचि श्रीकृष्ण असतां अंगेंसीं । शापु यादवांसी घडे कैसा ॥२८०॥