श्रीएकनाथी भागवत

ज्ञानेश्वरीतील उणीव एकनाथी भागवताने भरून काढली.


श्लोक १६ वा

 

एवं प्रलब्धा मुनयस्तानूचुः कुपिता नृप ।

जनयिष्यति वो मन्दा मुसलं कुलनाशनम् ॥१६॥

ऐकें परीक्षिति नृपवरा । यापरी यादवकुमरां ।

निधनाचा भरला वारा । तेणें ते ऋषीश्वरां छळूं गेले ॥६६॥

कपट जाणोनियां साचार । थोर कोपले ऋषीश्वर ।

मग तिंहीं काय वाग्वज्र । अतिअनिवार सोडिलें ॥६७॥

अरे हे प्रसवेल जें बाळ । तें होईल सकळकुळा काळ ।

निखळ लोहाचें मुसळ । देखाल सकळ मंदभाग्यें ॥६८॥;