श्रीएकनाथी भागवत

ज्ञानेश्वरीतील उणीव एकनाथी भागवताने भरून काढली.


श्लोक ११ वा

नारद उवाच-सम्यगेतद्ववसितं भवता सात्वतर्षभ ।

यत्पृच्छसे भागवतान्धर्मांस्त्वं विश्वभावनान् ॥११॥

नारद म्हणे सात्वतश्रेष्ठा । वसुदेवा परमार्थनिष्ठा ।

धन्य धन्य तुझी उत्कंठा । तूं भावार्थी मोठा भागवतधर्मी ॥११०॥

ज्याचेनि धर्माचे प्रश्नोत्तरें । हें विश्व अवघेंचि उद्धरे ।

हें विचारिलें तुवां बरें । निजनिर्धारें श्रीकृष्णजनका ॥११॥

तुझेनि प्रश्नोत्तरें जाण । साधक निस्तरती संपूर्ण ।

साधकांचें नवल कोण । महापापी पावन येणें होती ॥१२॥