श्रीएकनाथी भागवत

ज्ञानेश्वरीतील उणीव एकनाथी भागवताने भरून काढली.


श्लोक २१ वा

कविर्हरिरन्तरिक्षः प्रबुद्धः पिप्पलायनः ।

आविर्होत्रोऽथ द्रुमिलश्चमसः करभाजनः ॥२१॥

कवि हरि अंतरिक्ष । प्रबुद्ध पिप्पलायन देख ।

आविर्होत्र द्रुमिल सुटंक । चमस निर्दोष करभाजन ॥८२॥

एवं नवही नांवें जाण । यांचें करितां नामस्मरण ।

सकळ पापा निर्दळण । हे महिमा पूर्ण तयांची ॥८३॥

त्यांची परमहंसस्थिती । सांगेन मी तुजप्रती ।

ज्यांचेनि पावन होय क्षिती । त्या या नव मूर्ती पुण्य पूज्य ॥८४॥