श्रीएकनाथी भागवत

ज्ञानेश्वरीतील उणीव एकनाथी भागवताने भरून काढली.


श्लोक ४६ वा

ईश्वरे तदधीनेषु बालिशेषु द्विषत्सु च ।

प्रेममत्रीकृपोपक्षा यः करोति स मध्यमः ॥४६॥

ईश्वर मानी उत्तमोत्तम । तद्भक्त मानी मध्यम ।

अज्ञान ते मानो अधम । द्वेषी ते परम पापी मानी ॥६५०॥

ईश्वरीं ’प्रेम’ पवित्र । भक्तांसी ’मैत्री’ मात्र ।

अज्ञानी तो कृपापात्र । ’उपेक्षा निरंतर द्वेषियांची ॥५१॥

हे मध्यम भक्तांची भक्ती । राया जाण ऐशिया रीतीं ।;

आतां ’प्राकृत’ भक्तांची स्थिती । तेही तुजप्रती सांगेन ॥५२॥