श्रीएकनाथी भागवत

ज्ञानेश्वरीतील उणीव एकनाथी भागवताने भरून काढली.


श्लोक ४१ वा

राजोवाच-कर्मयोगं वदत नः पुरुषो येन संस्कृतः ।

विधूयेहाशु कर्माणि नैष्कर्म्यं विन्दते परम् ॥४१॥

राजा निजश्रद्धासंपन्न । अतिविनीत करी प्रश्न ।

जेणें तुटे कर्मबंधन । तो कर्मयोग संपूर्ण सांगा स्वामी ॥७५६॥

कोणें कर्में कर्म तुटे । नैष्कर्म्यसिद्धि स्वयें प्रगटे ।

पुरुषा पुरुषोत्तम भेटे । हें मज गोमटें वर्म सांगा ॥७५७॥